Ganapati Special 2009 – Part I

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” होय ह्या वेळेस कोकणातल्या घाटातून जेव्हा आमची बस नागमोडी वळणे घेत होती तेव्हा माझ मन हेच गाण गुणगुणत होता. बर्‍याच आठवड्यांच्या सुट्टी नंतर पाउस दादाने हजेरी दिली होती. जणू बाप्पाच्या स्वागतासाठी सारे रस्ते स्व्च्छ धुऊन, अंगण झाडून सुंदर हिरवे गार करून ठेवले होते. आम्ही पहाटे 5 च्या सुमारास तळरे येथे पोहोचलो. आई बाबा तिथे मामा च्या घरी उतरले, मी ताई सोबत कणकवली पर्यंत गेलो. दीपक पुण्याहून काल रात्रीच कोकणात यायला निघाला होता हे मला माहीत होते म्हणून मी त्याला फोन करून विचारले, तर साहेब कणकवली नजिकच होते. मग काय पुण्यातल्या कॉलेजचे 2 जुने मित्र कोकणात भेटल्यावर काय फक्कड चहा आणि कांदेपोहे तर हक बनता है यार. दीपकचे बाबा सकाळी 3 वाजताच कणकवलीत पोहोचले होते. तिथून ते दोघही घोटग्यात त्यांच्या गावी निघून गेले, मी ताईला आधीच घरी सोडून आलो होतो. मी पुन्हा तल्र्यच्या प्रवासाला निघलो. ह्या वर्षीचा आमचा मुक्काम मामाच्या घरी होता. तल्र्यात पोहोचेपर्यंत 8 वाजले होते. मी खळ्यातच मामा बरोबर गप्पा हाकत बसलो होतो. प्रवासातला सगळा क्षीण जणू कधीच पळून गेला होता, सकाळी चिमणी पाखरांची होणारी चीवचिवाट, कोंबड्यांची बांग, पूर्वेस नुकत्याच उगवलेल्या सूर्यदेवाने आभाळात रंगवलेली छ्टा. सगळ वातावरण कस प्रसन्न वाटत होत. मी पाठीवरची सॅक तशीच दारात कशीबशी टाकली आणि कॅमरा घेऊन भटकयला निघालो. सकाळी पाऊस पडून गेल्यावर झाडांच्या पालवीवर लोंबकळत बसलेले थेंब, ओली माती, आपल्या घरातून सकाळचा नाश्ता शोधायला निघालेल्या गॉगल गाय आणि प्रातःक्रीयेहून चिम्पाट हलवत परतत असणारे गावकरी. माझी आपली बेछूट फोटोग्रफी सुरू होती. कणकवालित खाल्लेल्या पोह्याची चव अजूनही जिभेवर रेन्गाळत होती आणि मी अजुन ब्रश देखील केला नव्हत याचाही विसर मला पडला होता. तितक्यात मला मॉर्निंग nature’s call कॉल आल्याची जाणीव झाली आणि माझी पाऊले घराकडे निघाली. तसा शनीवारच्या दिवशी सगळ्यांची गणपतीची पूर्व तयारी सुरू होती. मामाच घर हाइवेला लागून असल्यामुळे दिवसभर मुंबई पुण्याहून गणेशोत्सवासाठी कोकणात येत असलेल्या चाकरमान्यांच्या गाड्यांची रहदारी दिसून येत होती. मुंबई आणि कोकणातल्या गजाली हाकता हाकता संध्याकाळ कधी झाली तेच कळल नाही. मग देवघरात आरास आणि पताके लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला. कुणाची रांगोळी घालायची घाई तर कुणाची चिकी बनवायची.. गावी पताके चिटकवण्यासाठी घवाच्या पीठाची पेस्ट बनवली जाते त्याला चिकी म्हणतात :p . सर्व काही सज्ज करून आम्ही रात्री 10 वाजताच अंथरुणात गुडूक झालो. दुसरया दिवशी गणेश चतुर्थी. रस्त्यावरून “गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया” असा गजर ऐकू येत होता. प्रत्येक जण आपापले घरगुती गणपती घेऊन जात होते. आम्ही सुद्धा गणेशाची मूर्ती घेऊन आलो आणि स्थापन केली. पूजा होवेस्तर महिला मंडळाची जेवण घाई बघायला फार मजा आली. 21 मोदक, भाताची मुद, वरण, कोकण स्पेशल चण्याची उसळ आणि पापड लोणच्याने सुघ्र्णीनी लाडक्या बाप्पा साठी मेजवानी तयार केली होती. नैवेध दाखवून आरती झाली आणि सर्वांनी मोदकावर अगदी ताव मारला. मस्त पैकी जेवण करून एक वामकुक्शी घेई पर्यंत संध्याकाळ झाली.
संध्याकाळी पलटण निघाली रामेश्वरला (विजयदुर्ग). तल्र्याहून 52 किमी अंतरावर असलेले विजयदुर्ग खरतर माझा मूळ गाव पण आम्ही तिथे फक्त देव दर्शनाला जातो. तिथल रामेश्वर मंदिराचा जवळ जवळ 300 वर्ष जुना इतिहास आहे. मंदिराची बांधणी कोकणातल्या सर्व मंदिरांपेक्षा वेगळी अशी आहे. रस्त्यावरून फक्त मंदिराची हल्लीच्या काळातच रंगवलेली कमान दिसते. त्या भव्या कमानीतून आत शिरल्यावर एक उतरण आहे. कमानी खाली उभे राहून खाली पाहिल्यास अजुन एक छोटी कमान दिसते. त्या कमानीला एक मंदिराच्याच वयाची घंटा लावली आहे. हे मंदिर एका खड्यात आहे त्यामुळे त्याचा कळस बाहेरून दिसत नाही. खाली उतरून

गेल्यावर आत शिरताच मंदिराच्या आवारात 4-5 दीपस्तंभ दिसतात. कौलारू मंदिराच्या चारी बाजूस घनदाट झाडी आणि जंगल आहे. आत शिरल्यावर मंदिराच्या लाकडी खांबावर केलेले त्या काळ्चे कोरीव काम देखील लक्ष वेधून घेणारे आहे. रंगकाम देखील फारच जुने कळून येते. गाभार्यात शिरल्यावर आत मध्ये अजुन एक छोटा गाभारा आहे त्या प्राचीन काळीन शंकराची पिंडी दिसते. बाहेर एक भव्य नंदी आहे. उजव्या बाजूस एक रिकामा छोटा देवारा आहे, त्यात पुर्वी एक 3 फुट उंच रामेश्वर (वेतोबा) नन्दिवर बसला आहे अशी एक चांदीची मूर्ती होती ती आता तिथून हलवण्यात आली आहे. नेहमीच्या गुरव काका या वेळेस नव्हते. काही महिन्यान पूर्वीच ती मूर्ती चोरीस गेली होती आणि मंदिरातील गुरवावर देखील हल्ला केला गेला होता. नंतर ती मूर्ती सिंधुदुर्ग पोलिसांनी कणकवलीत शोधून काढली. असो… कौलारू छ्प्परम्ध्येच एक काच खोचली होती त्यातून सूर्यप्रकाश (Rhembrandt light) गाभर्‍यात पडून गाभार्यातल्या खाबावरील कोरीव नक्षीचे सौंदर्य अजुनच खुलवत होता. रामेश्वर मंदिरातून बाहेर आल्यावर एक रस्ता गावात जातो आणि तिथून पुढे विजयदुर्ग किल्ल्यावर. 2 वर्षापूर्वी ह्या किल्ल्याला 800 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने एक मोठा किल्ले महोत्सव आयोजित केला होता, पण ते तेवढ्या पुरतच, आता पुन्हा हा किल्ला दुर्लक्षितच आहे. ह्या वेळेस वेळे अभावी आम्हाला किल्ल्याला भेट देता आली नाही.
आम्ही तिथून देवगडला अजुन काही नातेवाईकांकडे कडे बाप्पाच दर्शन घेऊन पुन्हा तळरयाला निघालो. संध्याकाळी पुन्हा आरतीची तयारी आणि धांदल. कोकणात तशी रात्र लवकरच होते. लोक 8.30-9.00 ला दुकान बंद करून आपापल्या घरी निघून जातात. जेवून खाऊन लवकर झोपतात. अगदी 10 वाजताच गुडुक. मी आपला मांडीवर ठेवायचा कंप्यूटर घेऊन बसलो होतो थोडावेळ, पण मलाही नंतर गाई गाई करावी लागली कारण होत मच्छर. बाकी सर्व जण मच्छरदानी मधे केव्हाच स्वप्नांच्या दुनियेत गेले होते. मीही लाइट मालवुन झोपी गेलो ती थेट दुसरया दिवशी चक्क 8 वाजता जाग आली मला.
सोमवार, आमचा राजापुरात जाईचा प्लान ठरला होता. सकाळी जोरदार पाऊस पडत होता. बर्‍याच वर्षांनंतर आम्ही आईच्या माहेरी म्हणजे आणसुरे, पांगेरयात जाणार होतो. घरी जायच्या आधी आम्ही गिरेश्वरच दर्शन घेतल. गिरेश्वर हे अणसुरयाचे ग्राम दैवत. मंदिर तसे फारसे जुने वाटत नाही पण त्याचे नूतनीकरण केल्यामुळे असावे कदाचीत. ह्या मंदिरातील शंकराच्या पिंडीचा प्रवाह उत्तर बाजूस आहे. आजवर मे पहिलेली ही पहिलीच पिंडी अशी. तिथून पुढे आम्ही पंगेरयात गेलो. घरच्या बाप्पाच दर्शन घेऊन माहेरवाशिण (माझी आई) आपल्या जुन्या मैत्रिणींना भेटून आली. तिथून लगेचच आम्ही निघून राजापुरात पोहोचलो. राजापुरातून एक रस्ता सागर-मार्ग (आडिवरे-गावखडी-पावस) रत्नागिरीला जातो. त्याच रस्त्यावर आडिवरे हे छोटसं गाव लागता तिथे महाकाली मातेच मंदिर आहे. ते खरतर आमच कुळदैवत. आम्ही कोकणात गेलो की नेहमी जातो तिथे. हे मंदिर देखील फार जुने आहे. एकंदरीत पुणेरी बांधणीच मंदिर वाटत हे. मंदिराच्या आवारात एक विहीर आहे. मला जास्त कौतुक वाटत ते त्या विहिरीतून पाणी काढण्याच्या पद्धतीचे. एक मोठा बांबूला एक प्लास्टिक टाइयर सारखी पिशवी अडकवली आहे आणि रैलवे फाटकसारखा एक लाकूड अडकवून ठेवल आहे. ते लाकूड वर खाली करून विहिरीतून पाणी काढता येत. मंदिराच्या आवारात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. महाकाली मंदिर देखील खूप जुने दिसून येते पण त्याचा टापटीपपणा जपण्याचा गावातील लोकांनी पुरेपूर केलेला प्रयत्न दिसून येतो… ह्या मंदिराच्या पाठीमागे एक नागेश्वराचे मंदिर आहे तिथे एक जिवंत वारुळ देखील आहे. आणि शेजारी अजुन एक रामाचे मंदिर सुद्धा आहे.. आम्ही मोस्ट्ली दुपारी जात असल्यमुळे आम्हाला रामाच्या मंदिरात कलावती आईच्या भजनाचा आवाज नेहमी येतो. तिथून दर्शन घेऊन आम्ही गावखडीला एका मावाशीच्या घरी निघालो. गावखडी साधारणता 10 कि.मी. अंतरावर आहे आडिवरे पासून. एका बाजूला खाडी आणि दुसरया बाजूस

समुद्र आणि समुदराजवळून येणार्‍या वार्‍याला थोपवणारे सुरुचे बन. आणि ह्या सगळ्याच्या जोडीला होता मुसळधार पाऊस. सुरुच्या बना शेजारहून जाणारा रस्ता आणि दुसरया बाजूला गावखडी हे छोटसं गाव. दीड दिवसाचे गणपती विसर्जन सुरू होते. तिथून पुढे आम्ही पावसला निघालो. पावस तिथून पुढे फक़त 8 कि.मी. अंतरावर आहे. पावसला स्वामी स्वरुपानंदांच आश्रम आहे. तिथे उत्तम राहण्या खाण्याची सोय आहे. मंदिर फार सुरेख बंधणीचा आहे आणि खूप भव्य आहे. मंदिरात वेग वेगळ्या प्रकारची फूल झाडे लावली आहेत आणि मंदिराच्या मागच्या बाजूस बाबांचा मठ आहे. तिथे शिस्तबद्ध पद्धीने भाविकांच्या जेवणा खाण्याची सोय केली जाते. मंदिरात शिरल्यावर फार प्रसन्न वाटते आणि संपूर्ण मंदिरात महाराष्ट्रातील विविध संतांचे फोटो लावले आहेत. असे म्हणतात त्या मंदिरात गेल्यावर तिथे ठेवण्यात आलेल्या पुस्तकातील एखादा तरी पान आपण आवर्जून वाचाव. मंदिराच्या उजव्या बाजूस स्वामींचे जन्म स्थान आहे तिथे त्यांची प्रतिकृती तयार करून ठेवली आहे आणि ती जणू जिवंत वाटते. मंदिराच्या परिसरातील झाडांवर माकडाचा सुसाट विहार सुरू असतो. पावस मधे एक विशिष्ट प्रकारची जादू आहे, जी तुम्हाला तिथून बाहेर पडुच देत नाही. नको नको
वाटत असतानाही आम्हाला पावसहून निघावे लागले. घरी बाप्पा वाट पाहत होता आमची…

continued…

7 responses to this post.

  1. Posted by Anjani on 07/09/2009 at 16:09

    very nice. kokanchi aatvan karun dilis.

    प्रत्युत्तर

  2. Posted by Harshada on 08/09/2009 at 00:34

    marathi essay writing madhe kayam first yaychas na… hehee.. kiddinn… mast vatal vachun… :

    प्रत्युत्तर

  3. Mitra even I am from Talere, Well never stayed there but thatz my native place. mhanje aapan gaav-vale jhaalo :) Nice to read your post.

    प्रत्युत्तर

  4. Posted by नामकाका on 16/11/2010 at 10:00

    मस्त. तू म्हणजे अगदी सगळं डोळ्यांसमोर ठेवतोस.

    प्रत्युत्तर

  5. [...] Ganapati Special 2009 – Part I September 2009 5 comments 5 [...]

    प्रत्युत्तर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.