मंगळवारचा दिवस उजाडला. तळर्या-विजयदुर्ग मार्गावर 1-कि.मी. पुढे गेल्यावर एक लेफ्ट घेतल्यावर ओझरम् नावाचे छोटेशे गाव आहे, बहुतेक घरं राण्यांची आहेत या गावात. कोकणतात राणे म्हणजे वैभववाडी किंवा ओझरम्. Wholesale मधे आहेत घरं राण्यांची. 3-4 घरातल्या बाप्पांचा दर्शन घेऊन आम्ही परतीची वाट धरली. मंगळवार आणि बुधवार तसा रेटारेटीतच गेला. काही विशेष भटकन्ती देखील नाही.
गुरुवारचा दिवस उजाडला मालवणात जायच्या घाईने. मालवणातही तसे आमचे बरेच नातेवाईक मंडळी आहेत पण आम्ही ह्या वेळेस आचर्यात जाणार होतो. आचर्यात जाण्यासाठी कणकवली बाजारपेठेमधून एक शॉर्टकट आहे. दुसरा रस्ता मालवण मार्गे आहे. तळर्याहून कणकवली 22 कि.मी. आहे. कणकवलीत आगरकरांच्या आणि काणेकरांच्या गणपतीचा दर्शन घेऊन आम्ही आचर्याल्या निघालो. थेट आचर्याल्या जाण्याऐवजी आम्ही गाडी बांदिवडयात वळवली. बंदिवडे हे गाव अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेल आहे. चारी बाजूंनी घनदाट झाडी आणि त्यातून जाणारी एवलीशी डांबरी वाट. मुख्य म्हणजे आम्हाला ज्यांच्या घरी जायच होता त्यांचा पत्ताच आम्हाला माहीत नव्हता.:p तरी आम्ही चान्स घेत विचारत गेलो. आणि शेवटी एकदा बांदिवडयात पोहोचलो. त्या डांबरी रस्त्यात 2 वयस्कर काका आम्हाला गप्पा हाकत येताना दिसले. कोकणात हे एक बर असता तुम्ही अगदी 70रीच्या वयातल्या माणसाच नाव घेऊन सुद्धा पत्ता विचारू शकता. पुण्यात मात्र हे अस केल्यास पत्ता सांगणारी व्यक्ती आधी तुम्हाला केसा पासून बुटापर्यंत स्कॅन करते आणि तुम्ही लहान तोंडी मोठा घास घेतलाय याची जाणीव करून देते आणि नंतर त्यांचा मूड असेल तरच पत्ता सांगते. त्या 2 काका शेजारी गाडी थांबवताच, 10 वर्षांच्या चिमुर्ड्या अक्षय ने खिकीतून डोक बाहेर काढत त्यांना विचारल, “हे शिवराम परबांच घर कुठे आहे”. ते काका हसले आणि म्हणाले, “कोणते परब?” त्यावर आमच्या अक्षयकडे मात्र उत्तर नव्हतं. :प. मी लगेचच म्हणालो, “चिंचवडचे परब”. “अच्छा म्हणजे दाजीकडे जायचं का तुम्हाला?” माझ्या डोक्याच्या कोपर्यात कुठेतरी हा शब्द मॅच झाला आणि मी लगेचच होकार दिला. त्या काकानी नंतर आम्हाला रस्ता दाखवला. परब काकान्ना आम्ही दिलेली ही सर्प्राइज़ विज़िट भाऊन गेली. काकूना तर काय करू आणि काय नको अस झाल होता. तसं आमचं काही रक्ताचा नातं नाही ह्याच्या बरोबर पण my parents believe ही नाती फार अनमोल असतात, नेहमी नवीन नवीन माणसं जोडावी आणि अशी नाती तितकीच जपावी जितकी आपण रक्ताची नाती जपतो and so do i:) काका नंतर आम्हाला पावणाई देवीच मंदिर दाखवायला घेऊन गेले. फार अभिमानाने ते मंदिराची माहिती देत होते.
कोकणातली मंदिर दिवसेन दिवस पर्यटकांना आकर्षित करत आहेत. मग ती 300 वर्ष जुन्या रामेश्वरासारखी असुदेत किंवा पूनर बांधणी केलेल्या पावणाई देवीच असो. मला मात्र ती जुन्या पद्धतीचीच आवडतात. तिथून आम्ही गाडी थेट आचर्यात नेली. गोलतकरांच्या गणपतीचे दर्शन घेऊन मी आपला कॅमरा घेऊन भटकंतीला निघालो. माऊशीच्या घराच्या पाठीमागे एक पडलेलं घर मला दिसलं, मी सहज म्हणून त्या घराजवळ चक्कर मारत होतो, शेजारच्या नवीनच बांधलेल्या घरातून एक काकू बाहेर आल्या आणि म्हणाल्या “आमचाच हा ता हव, पडला म्हणून ह्या नवीन बांधलव, येवा गनपती बघा आमचो.” मी दर्शन घेऊन त्यांच्या बागेतल्या फूल झाडांचे फोटो काढण्यास गेलो. “देवकेळीचा फूल हा ता, तुमका व्हया तर काढून देतय, देऊ काय?” मीही त्यांचा मान ठेवून ते रोप घेतलं. “कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी..” ग.दि मा च्या गाण्याच्या प्रत्यय मला तेव्हा आला. तिथून आम्ही लगेच निघून कांदळगाव मार्गे आंगणेवाडी जवळचे जलमंदिरला गेलो. ह्या मंदिराचं वैशिष्ठ्य म्हणजे हे मंदिर चारी बाजूंनी पाण्यात आहे. आणि अगदी खोल ठिकाणी आहे. विशेष म्हणजे त्याच्या बांधणीवरुन ते फार जुने असल्याच कळून येत होतं. मंदिराच्या सभोवताली सुंदर रंगीबेरंगी झाडाची लागवड करण्यात आली आहे आणि मुख्य म्हणजे त्याची तेवढी देखरेख ही केली जाते असे कळून येत होते. हे मंदिर सातेरी देवीच आहे आणि असे जाणवते की हे ठिकाण फार कमी लोकांना माहीत असावे. तिथून आम्ही आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला गेलो. ह्या देवीची जत्रा
कोकणातल्या फेमस जत्रेपैकी एक आहे. लाखो लोक नवस फेडण्यासाठी येथे येतात. रांगेत उभा असताना माझ्या पाठीमागचा माणूस त्याच्या मित्राला मंदिराची माहिती सांगत होता ती मी तुम्हाला सांगतो. असं म्हणतात माघ महिन्याच्या सुरुवातीला गावातली लोका एक विशिष्ट प्रकारच्या डुककराच्या शोधत निघतात. माघ म्हणजे जानेवारी महिना बरका! हे डुककर सापडेपर्यंत गावकरी गावात फिरकत सुद्धा नाही. हे सापडल्यानंतर देवीला कौल लावला जातो आणि मग देवीच्या कौलवरून जत्रेचा आठवडा निश्चित केला जातो. ही माहिती कितपत खरी आहे ते मला देखील नाही माहीत, पण कोकणातल्या बर्याच गावात कौल लावण्याचा प्रकार घडतो आणि लोकांची ह्यावर विश्वास देखील आहे. अंगणेवाडीतून दर्शन घेऊन आम्ही वडाचा पाट नावाच्या गावात गेलो. तिथे देखील एका घरात बाप्पाचं दर्शन घेतला. घरात फक्त 2 बाप्ये(पुरूष) होते परंतु नाष्टयाला त्यांनी करंजी आणून ठेवली होती. मी विचार करत होतो, नक्की ह्या करंज्या बनवल्या कुणी. पण करंज्यांच्या चविने माझ्या डोक्यातला हा विचार भुरकन उडून गेला होता. संध्याकाळ होत आली होती. मामाने जी गाडी पळवली ती सरळ कणकवलीत आणुन उभी केली. तिथून तलेरे अर्ध्या तासवर होता. Official भटकंती ह्या दिवशीच संपली होती, पण शुक्रवारी ओव्सा होता, आणि गौरी देखील गणपतीच्या सोबतीला येतात आणि वडे मटणचा कार्यक्रम असतो.

मी मामासोबत तलेरेच्या बंडवाडितल्या घरांतल्या गौरी-गणेश दर्शनाला निघालो. सुंदर सुंदर साजवलेल्या गौरी पाहून कोकणशी माझी असलेले ओढ अजुनच घट्ट झाली. हाइवेला जोडुन असलेल्या ह्या तलेरे गाव सुद्धा आतून एवढा सुंदर आहे हे मला नवीनच कळल होत. मीही ते निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवत होतो. लांबच लांबवर पसरलेली भात शेती. पाऊस पडून गेल्यावर हवेतला गारवा. संध्याकाळचा मावळणारा सूर्यदेवाने भात शेतावर शिंपडलेला सोनं जणू मी माझ्या डोळ्यात साठवून घेत होतो. सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुले. माळ रानावर विहार करणारे मुंबईच्या आरे
कॉलनीमध्ये सुद्धा न दिसणारे असे पक्षी. गुरांना शेतातुन हाकत घरी घेऊन जाणारे गुराखी आणि धनगर. ह्यांच्याशी ओळखीची गरज नाही, तुम्ही नुसते हात जरी दाखवला तरी ते “राम राम” अशी हाक देतात. संध्याकाळची रात्र कधी झाली हे कळलेच नाही. जस जसे सुट्टी कमी होत होती माझं मन उदास होत होतं.
शनिवारी सकाळीच मी आणि बाबा कणकवलीला जाण्यासाठी निघालो। तिथून आमची संध्याकाळी 4.30 ची ट्रेन होती मुंबईसाठी। कणकवलीत आगरकर आणि कानेकरांच्या घरी वेळ कसा जातो हे कळतच नाही। ह्या वेळची माझी कोकण ट्रिप जरा स्पेशल ठरली कारण माझ्या कॅमेराला बरचं असं मिळालेलं खाद्य. तुम्हाला देखील कधी संधी मिळाली तर नक्की कोकणातल्या गणेशोत्सवाची मजा लुटून या। गाइड हवा असेल तर मी नक्की यायला तयार आहे॥ एनिटाइम।
..
येवा कोकण आपलोच असा ….
Posted by Harshada on 08/09/2009 at 00:55
chan…
Posted by Deeps on 08/09/2009 at 01:20
mitra lay bhari…..ek number lihilas….koknat javasa vatayala laglay parat
… kokan dolya pudhe jivant ubha kelas….
- Deepak
Posted by supriya hindlekar on 09/09/2009 at 15:07
Aprateem ….:P
Posted by Priti on 13/09/2009 at 21:38
khup chan…
asach lihit raha tujhe bhatkanti che anubhav…
Posted by Purva on 21/09/2009 at 01:18
kokanchi majja ji/jo anubhavel ti/to khar jeevan jagali/jagala!!!
tu lihilela tuze pravas varnan vachun aprtyakshritya mi tithech hote as janaval….
Posted by paps sapa on 21/09/2009 at 21:59
thankuzz ppl…
Posted by Ganapati Special 2009 – Part I « …तारकरांचा पप्या… on 21/11/2009 at 21:28
[...] « Ganapati special 2009- Part II शुभ दीपावली [...]
Posted by Rahul on 06/08/2010 at 13:31
far chan lihtos….
Posted by 2010 in review « तारकरांचा पप्या on 02/01/2011 at 23:54
[...] Ganapati special 2009- Part II September 2009 8 comments LikeBe the first to like this post. [...]