
BEST MUMBAI
माझा हा पोस्ट एखाद्या बेस्ट महामंडळाच्या अभियंत्याने वाचला तर मला फार आवडेल. खरंतर ही कल्पना माझ्या डोक्यात बर्याच महिन्यांपासून घुटमळत होती, आज ती मी वेब वर उतरवतोय. गेल्या वीकेंड मी सायनला गेलो होतो मित्राला भेटायला, घरी यायला बराच उशीर झाला होता. रात्रीचे १०-१०.३० वाजले होते. कॉल सेंटर च्या इडिका, सुमो समोर येऊन थांबायच्या आणि गाडी चालवणारा हळूच मान वर करून अंदाज घ्यायचा आणि मी आपला आडव्या मानेने ना म्हणून खुणवायचो. हळू हळू स्टॉप वरची गर्दी वाढत चालली होती. सगळेच कंटाळले होते. ताट्कळत उभे होते. जवळ जवळ अर्धा तास झाला होता आणि एकही लाल गाडी फिरकली नव्हती. त्या वेळी माझ्या टाळक्यात ही कल्पना सुचली. बेस्ट ने खरतर GPS इनस्टॉल करायला हवेत. तसंही जे नवीन स्क्रीन्स लावण्यात आले आहेत ते कोणत्यातरी वायरलेस प्रोटोकॉल वर ऑपरेट होतात. GPS लावल्यामुळे दोन फायदे होतील. एक म्हणजे प्रवाश्यांना ताटकळत उभ राहावं नाही लागणार आणि दुसर म्हणजे बेस्ट स्वतःही आपल्या बसेस वर ट्रक ठेवू शकतील. आता ह्याचा वापर कसा करता येईल ते पाहुया. नवीनच लावलेल्या झगमग बस्टॉप वर च्या डिजिटल डिसप्ले चा वापर पुढल्या काही वेळेत येणार्या बसेसची नंबर दाखवण्यासाठी करता येईल. कोणती बस येणार आहे हे कळण्यासाठी त्या डिजिटल डिसप्ले बरोबर एक रिसेप्टर लावता येईल जो जवळ (१-२ की.मी.) अंतरावर आलेल्या बसेसचे सिग्नल्स रिसीव करून ते डिसप्ले करेल. प्रत्येक बसमधे एक सिंगल ट्रॅनस्मिटर लावता येईल जो हे सिग्नल्स ट्रॅनस्मिट करेल. आता हे इंप्लिमेंट कसं करायचं हा झाला तंत्रज्ञानाचा भाग. ही एक रॉ आइडिया आहे. बघू पुढल्या काही वर्षात वापरातही येईल कदाचित.
Like this:
Be the first to like this post.
Posted by Sarika on 06/02/2010 at 14:42
kalpana chhan aahe.
maaz sarkar sthpan zaal ki , karatech mi ya drushtine kahitari yogya
Posted by pravin on 06/02/2010 at 15:40
Idea changali ahe ani imlpimentable ahe ……from technical point of veiw possible
Posted by Praful Tarkar on 06/02/2010 at 15:52
धन्यवाद, बघुया कधी अंमलबजावणी होते ते.. बेस्ट तशी दिवसेन दिवस प्रगती करत चालली आहे.. हे असं काहीसं जर आलं तर अजुन हाय-टेक होईल
Posted by Dipali on 06/02/2010 at 23:21
Hi-tech & more public oriented! maja yeil asa zaal tar..
Posted by 2010 in review « तारकरांचा पप्या on 02/01/2011 at 23:54
[...] The busiest day of the year was February 6th with 146 views. The most popular post that day was बेस्ट आणि GPS. [...]