दुनियादारीचा After-Math

दुनियादारी cover pageतसा मी काही हाडाचा वाचक नाही. पण गेल्या 10 दिवसात मी सुहास शिरवळकराच्या दुनियादारीच्या पान अन् पान चापून चोपून वाचून काढलं होतं. शेवटची 50-60 पानं उरली होती.. काल रात्री बसून मी 40एक पाने सहज उडवून टाकली होती. कादंबरी संपवणे हे नीव्वळ एक कारण होतं, पण दुनियादारी हे खरच एक व्यसन आहे. डोळे पेन्गुळत होते पण श्रेयस तळवलकर आणि एम. के. श्रोत्रि ने अक्षरशः मला घेरून टाकला होता. असं वाटत होतं, ते माझ्या आजूबाजूलाच फिरता आहेत आणि पुढे काय करावं हे मला सतत विचारत आहेत. “अर्रे झोप रे आता, वाजले बघ किती!”, असा आतल्या खोलीतून आवाज आला तेव्हा पहिलं तर 1 वाजला होता. विचार केला शेवटचा एक चॅप्टर बाकी आहे तो सकाळी उठल्यावर उरकतो. श्रेयस आणि कट्टा गँगचा विचार करत-करत माझ्या डोळ्यांवर पापण्यानी कधी पांघरूण घातलं तेच मला कळलं नाही. सकाळी उठलो तोच, जणू श्रेयस माझ्या उत्तराची वाट पाहत असल्यासारखा मी लगेचच चहा बरोबर दुनियादारी हातात घेऊन बसलो. वाचता वाचता रात्री अर्धवट राहिलेलं सगळं चित्रं डोळ्या समोर पूर्ण होताना दिसत होता. पण शेवट आला तेव्हा कळला, त्या चित्रातलं एक टोक अपूर्णच होतं आणि ते कादंबरीच्या शेवटच्या ओळीत त्याचे रंग होते. तो शेवट इतका सर्प्राइज़िंग होता की मला त्या नंतर काय झालं कळलंच नाही. ती कादंबरी होती हे मी विसरुनच गेलो. एम. के. श्रोत्रि डोक्यात गरगरु लागला होता. च्याआईला, दिवसाची पार वाट लागली राव. ऑफीसला गेलो पण माझा डोकं ठणकतच होता. माझं डोकं अजुन त्या चित्तथारक शेवटात गुंतलं होतं. शेवटी ई-मैल टाकला आणि सरळ सुटलो.. घरी आलो आणि डोक्यावर मस्त चोपून तेल घातलं, बाम लावला, उशी डोक्यावर दाबून धरली आणि झोपून गेलो. बामच्या चुरचुरीला घाबरून का होईना दुनियादारीतला एक-एक कॅरक्टर डोक्यातून निघून जायला लागला. आता जरा बरं वाटतं आहे, तर म्हन्ट्ल हा अनुभव लिहून काढावा. मित्रांनो, तुम्हाला हे सर्व हास्यास्पद वाटत असेल कदाचित पण सुहास शिरवळकारांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत जे लिहिलं आहे त्यातला शब्द-न-शब्द खरा आहे. दुनियादारी खरच एक व्यसन आहे. गेले 10 दिवस मी सकाळी ऑफीसला जाताना, रात्री येताना, भर गर्दीत, एका हाताने खांबाला लोंबकळत बसमधे, मुंबईच्या प्रचंड गर्मित घामाच्या धारा ठिबकत उभा राहून सुद्धा दुनियादारी वाचलीय. घरी आंघोळीचं पाणी काढून थंड होईपर्यंत देखील, जेवणाचा ताट समोर थंड होताना देखील ह्या कादंबरीने मला खिळवून ठेवलं होतं बर्‍याचदा. अशी ही वेड लावणारी दुनियादारी प्रत्येकाने एकदा तरी वाचावी. शिरवळकर साहेब तुम्ही वेड लावलत. ग्रेट आहात तुम्ही! कादंबरीतल पुण आणि त्यातला प्रत्येक कॅरक्टर अक्षरशः जिवंत केलात तुम्ही डोळ्यासमोर. दुनियादारीच्या आफ्टर-माथ मधून जरी मी बाहेर पडलो असलो तरी आजचा प्रसंग मात्र माझ्या आठवणीत कायमचा राहणार आहे…

7 responses to this post.

  1. अशा एकसेएक अचाट, भन्नाट आणि वेगवान कादंबर्‍या लिहिण्यात सुहास शिरवळकरांचा हात कोणीही धरू शकणार नाही. पण दुर्दैवाने योग्य तो मान-सन्मान त्यांच्या वाट्याला कधीच आला नाही. ते नेहमीच दुर्लक्षित राहिले :-(

    प्रत्युत्तर

  2. great!!! atta jaun pustak aanava lagel… masta lihilay tumhi…

    प्रत्युत्तर

  3. Posted by Harshad on 13/04/2010 at 16:04

    Duniyadari is special and “Yeta jaata” is also really good book.

    प्रत्युत्तर

  4. [...] दुनियादारीचा After-Math April 2010 4 comments 4 [...]

    प्रत्युत्तर

  5. Posted by Kajrekarancha Papya on 30/04/2011 at 14:34

    “अशा एकसेएक अचाट, भन्नाट आणि वेगवान कादंबर्‍या लिहिण्यात सुहास शिरवळकरांचा हात कोणीही धरू शकणार नाही. पण दुर्दैवाने योग्य तो मान-सन्मान त्यांच्या वाट्याला कधीच आला नाही. ते नेहमीच दुर्लक्षित राहिले”

    सहमत आहे…

    प्रत्युत्तर

  6. http://suhasshirvalkar.blogspot.com/
    मित्रांनो सुशि बद्दल मला काय वाटत ते शब्दांत सांगणे कठीण आहे. कृपया त्यांच्यावरील हा ब्लॉग मात्र जरूर वाचा.

    प्रत्युत्तर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.