कारण आम्ही वृद्ध झालो…

गेटचा आवाज ऐकताच सगळ्यांच्या माना एकाच वेळेला गेट जवळ वळल्या. आत शिरल्यावरच एक विचित्र अशी फीलिंग आली. बाहेरच्या गॅलरी मधे एक मोठा टी.व्ही. ठेवला होता आहे बरीचशी मंडळी कोणता तरी चित्रपट् पाहत होती. आम्हाला पाहून प्रत्येकाच्या मनात हूरहूर सुरू झाली. हे नक्की कुणाला भेटायला आले आहेत हे कुणालाच समजेना. नायगाव पासून ७ – ८ की. मी. आत. मुंबई अहमदाबाद हाइवे वर चिंचोटी नाक्याहून १० मिनिटांच्या अंतरावर कामण नावाचे एक छोटेशे गाव आहे. तिथले “स्वयं-सिद्धा वृद्धाश्रम” हे सध्या श्री. पानसरे नावाचे आजोबा चालवतात. आम्ही आत गेल्यावर १०-१५ मिनिटे त्यांच्या कार्यालयात बसून त्याच्या कडून बरीच अशी माहिती जाणुन घेतली. वसईमधील श्रीमती. कल्पना संजय चुरी ह्या या आश्रमाच्या ट्रस्टी आहेत. हे आश्रम गेली ८ वर्षा पासून चालू आहे. जागा तशी लहान आहे. बैठ्या बांधणीचे एक लांब, शाळेसारखे दिसणारे घर. बाहेर एक छोटीशी बाग. बागेला लागून एक गणपती आणि शंकर मंदिर. पानसरे काकांशी बोलून आम्ही बाहेर बसलेल्या एक दोन आजी आजोबांबरोबर गप्पा मारल्या. कुणाच्या मुलाने कुणाला इथे आणून सोडला तर कुणाच्या दिराने आपल्या वहिनीला. प्रत्येकाची आपली अशी एक स्वतंत्र दुखी कहाणी होती. ते सगळं बघून आणि ऐकून मन भरून आलं. एका मावशिंची तर स्मृति देखील गेली होती असं आम्हाला कळलं. आपल्या पैकी कुणालाही ह्या आश्रमाला काही मदत करायची असेल तर नक्की कॉंटॅक्ट करा. सद्ध्या त्यांना इनवरटर च्या बॅटरीची गरज आहे. “स्वयं-सिद्धा वृद्धाश्रम” कॉंटॅक्ट नंबर : ९८९०५२४१८३. तुम्हाला जर आश्रमाला भेट द्यायची असेल तर आधी फोन वर चौकशी आणि नंतर जा. रेलवे ने जाणार असाल तर नायगाव स्टेशन ला उतरून पूर्वेला या. आणि तिथून चिंचोटी साठी शेअर रिक्षा मिळेल. माणसी १० रुपये. जर स्वतंत्र गाडीने जाणार असाल तर मुंबई-अहमदाबाद हाइवेवर मीरा भायंदर सोडल्यावर काही वेळाने चिंचोटी नाक्याला पोलीस चौकी जवळून राइट टर्न घ्या आणि कुणाला तरी पुढचा गावातला रस्ता विचारा.

2 responses to this post.

  1. Posted by sahajach on 30/05/2010 at 09:06

    खूप छान माहिती दिलीयेस… म्हणजे वृद्धाश्रमाला मदत करायची ईच्छा असेल तर नक्की करता येईल…. त्याबद्दल आभार!!

    आणि तिथे जाऊन या एकट्या पडलेल्या ज्येष्ठांबरोबर तुला वेळ घालवावा वाटला या विचाराबद्दल तुझे कौतूक!!

    प्रत्युत्तर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.