आयटी, इंजिनियरिंग, डॉक्टर, एमपीएससी, युपीएससी.. ह्या सगळ्या फील्ड्समधे करियर करणार्यासाठी बरीच माध्यमं उपलब्ध आहेत. ह्या क्षेत्रातील विद्यार्थी मंडळी सुद्धा त्याचा तितकाच उपयुक्तपणे उपयोग करून घेत आहेत. ह्या फील्ड्स व्यतिरिक्त, अजुन अनेक क्रियेटिव फील्ड्स देखील आहेत. ज्यात फोटोग्रफी, टायपोग्राफी, आनिमेशन, स्केचिंग, पेंटिंग, डिज़ाइनिंग, अड्वर्टाइज़िंग, वेक्टर-ग्रॅफिक्स, स्टोरी बोरडिंग सारख्या बर्याच शाखा आहेत ज्यात करियर करण्यासाठी बराच स्कोप आहे. पण काही कारणास्तव ह्या फील्ड्स मधल्या विद्यार्थ्यांना कंपॅरटिव्ली कमी साधनं उपलब्ध आहेत आणि असली तरी बर्याच जणांना ह्याची कल्पनाच नाही आहे. इथे मी प्रामुख्याने अप्लाइड आर्ट्स क्षेत्राबद्दल बोलतो आहे. ह्या क्षेत्रात बरीच कॉलेजस देखील आहेत पण तिथला अभ्यासक्रम देखील तोच-तोच रटाळ आहे. आणि हे विद्यार्थी जेव्हा इथून डिग्री घेऊन मार्केटमधे जॉब शोधायला निघतात तेव्हा मार्केटमधे केलं जाणारं काम बरंच वेगळं असतं आणि ह्या सगळ्याची सवय होईपर्यंत त्या नवख्या विद्यार्थ्याची फार दमछाक होते आणि बरेच जण फ्रस्टरेट देखील होतात. दुसरीकडे काही अशी कॉलेजस देखील आहेत जिथे इंडस्ट्री ओरियेनटेड कोर्सस आहेत, पण त्याची फीस common man च्या खिष्याला परवडणारी नसते. मग अश्या विद्यार्थ्यानी करायचं काय?
अस्मिता अप्लाइड आर्ट अकॅडमी हे गॅरेज वर्कशॉप अशयाच गरजू आणि इकचुक विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी “ओपन प्लॅटफॉर्म” ही नवीन
संकल्पना घेऊन आली आहे. ”ओपन प्लॅटफॉर्म” हे एक गिव-अँड-टेक सेशन दर शनिवार 4-7 ह्या वेळेत राबविले जाते. इथे आर्ट्स इंडस्ट्री मधले स्ट्रगल करून नाव कमावलेले दिग्गज आणि जे. जे., रहेजा, रचना, मॉडर्न ह्या सारखा आर्ट्स कॉलेज मधले विद्यार्थी आपली कला सदर करतात. त्यावर एक्सपर्ट्स कॉमेंट्स आणि टिप्स मुळे बर्याच विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा देखील होत आहे. डाइरेक्ट इंडस्ट्री एक्सपर्ट्स कडून मिळालेल्या टिप्स मुळे डिग्री आणि actual फील्ड वर्क मधला gap भरून काढण्याचा काम अस्मिताची टीम करत आहे.
अस्मिताची संकल्पना आशिष गंध्रे यांनी मांडली आहे. गंध्रे सर, हे स्वतः एक फोटोग्राफर आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळं करण्याच्या जिद्दीतून त्यांनी अस्मिताची सुरूवात केली आहे. कॉलेज मधली डिग्री आणि इंडस्ट्री मधला अनुभव, ह्यातली पोकळी भरून काढण्याचा गंध्रे सरांचा एक प्रयत्न.
अधिक माहितीसाठी www.asmita.co.in ह्या संकेतस्थळा भेट द्या अथवा फसेबूक वर “अस्मिता अकॅडेमिक कॉन्सेप्ट्स” हा ग्रूप जॉइन करा.
Posted by bhagwan nagapurkar on 01/11/2010 at 02:48
नमस्कार,
माहिती चांगली वाटली. होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असेल.
असेच लिहित चला
धन्यवाद
भगवान नागापूरकर
( जीवनाच्या रगाड्यातून ब्लॉग करते. )
Posted by राहूल भजे on 17/12/2010 at 00:41
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत.