प्रेम

सोप्प असतं हो प्रेम करणं,                              100_8789
निभवणं कठीण असतं
सोप्प असतं प्रेमाला नावं ठेवणं,
ते उमजण कठीण असतं
सोप्प असतं समोरच्याकडून अपेक्षा करणं,
त्या पूर्ण करणं कठीण असतं
सोप्प असतं प्रेमसाठी दुसर्यांना दुखावणं,
कठीण असतं ते, त्यांना सांभाळून प्रेम निभवणं
सोप्प असतं प्रेमात स्वार्थी होणं,
कठीण असतं ते प्रेमात त्याग करणं.
सोप्प असतं प्रेमात सर्व हरणं,
कठीण असतं ते, प्रेमात प्रेमाने सर्वांना जिंकण
प्रेम म्हणजे फक़त एकत्र येणच नव्हे
तर दूर राहून ही समोरच्याच मन कळनं हे खर प्रेम!
Advertisements

पावसाच्या शुभेचा

पहिला पाउस! ओली माती, ओला सुवास, कांदा भजी, गरम चहा, भीजलेली खिडकी, भीजलेल्या खिडकीतून दिसणारी भिजताना ती, पावसाच्या मिठीत विरघळणारी ती, छत्री, विंडचीटर, चप्पल शोधण्याची गडबड. पाउस थांबल्यावर डब्क्यात खेळणारी चिल्लर पार्टी, पानांना सावरलेले थेंब, हसरी फुले, प्रसन्न पालवी, धरणी अभळाचा शृंगार झाल्यावर तृप्त झालेली ओली माती आणि तिचा सुवास, तिच्या गर्भातून उगवणार्या नव्या कल्पना, नव्या आकांशा! पावसाच्या शुभेचा!

2010 in review

The stats helper monkeys at WordPress.com mulled over how this blog did in 2010, and here’s a high level summary of its overall blog health:

Healthy blog!

The Blog-Health-o-Meter™ reads Wow.

Crunchy numbers

Featured image

A Boeing 747-400 passenger jet can hold 416 passengers. This blog was viewed about 3,200 times in 2010. That’s about 8 full 747s.

 

In 2010, there were 9 new posts, growing the total archive of this blog to 24 posts. There were 2 pictures uploaded, taking up a total of 715kb.

The busiest day of the year was February 6th with 146 views. The most popular post that day was बेस्ट आणि GPS.

Where did they come from?

The top referring sites in 2010 were marathiblogs.net, papssapa.blogspot.com, blogger.com, facebook.com, and mr.wordpress.com.

Some visitors came searching, mostly for खेळ मांडला, श्रावणमासी, कणकवली, मालवण, and राजापूर.

Attractions in 2010

These are the posts and pages that got the most views in 2010.

1

बेस्ट आणि GPS February 2010
4 comments

2

खेळ मांडला…. February 2010
9 comments

3

दुनियादारीचा After-Math April 2010
4 comments

4

Ganapati Special 2009 – Part I September 2009
5 comments

5

Ganapati special 2009- Part II September 2009
8 comments

‘कले’चं “Open Platform”

आयटी, इंजिनियरिंग, डॉक्टर, एमपीएससी, युपीएससी.. ह्या सगळ्या फील्ड्समधे करियर करणार्‍यासाठी बरीच माध्यमं उपलब्ध आहेत. ह्या क्षेत्रातील विद्यार्थी मंडळी सुद्धा त्याचा तितकाच उपयुक्तपणे उपयोग करून घेत आहेत. ह्या फील्ड्स व्यतिरिक्त, अजुन अनेक क्रियेटिव फील्ड्स देखील आहेत. ज्यात फोटोग्रफी, टायपोग्राफी, आनिमेशन, स्केचिंग, पेंटिंग, डिज़ाइनिंग, अड्वर्टाइज़िंग, वेक्टर-ग्रॅफिक्स, स्टोरी बोरडिंग सारख्या बर्‍याच शाखा आहेत ज्यात करियर करण्यासाठी बराच स्कोप आहे. पण काही कारणास्तव ह्या फील्ड्स मधल्या विद्यार्थ्यांना कंपॅरटिव्ली कमी साधनं उपलब्ध आहेत आणि असली तरी बर्‍याच जणांना ह्याची कल्पनाच नाही आहे. इथे मी प्रामुख्याने अप्लाइड आर्ट्स क्षेत्राबद्दल बोलतो आहे. ह्या क्षेत्रात बरीच कॉलेजस देखील आहेत पण तिथला अभ्यासक्रम देखील तोच-तोच रटाळ आहे. आणि हे विद्यार्थी जेव्हा इथून डिग्री घेऊन मार्केटमधे जॉब शोधायला निघतात तेव्हा मार्केटमधे केलं जाणारं काम बरंच वेगळं असतं आणि ह्या सगळ्याची सवय होईपर्यंत त्या नवख्या विद्यार्थ्याची फार दमछाक होते आणि बरेच जण फ्रस्टरेट देखील होतात. दुसरीकडे काही अशी कॉलेजस देखील आहेत जिथे इंडस्ट्री ओरियेनटेड कोर्सस आहेत, पण त्याची फीस common man च्या खिष्याला परवडणारी नसते. मग अश्या विद्यार्थ्यानी करायचं काय?

अस्मिता अप्लाइड आर्ट अकॅडमी हे गॅरेज वर्कशॉप अशयाच गरजू आणि इकचुक विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी “ओपन प्लॅटफॉर्म” ही नवीन Asmita Courses Treeसंकल्पना घेऊन आली आहे.  “ओपन प्लॅटफॉर्म” हे एक गिव-अँड-टेक सेशन दर शनिवार 4-7 ह्या वेळेत राबविले जाते. इथे आर्ट्स इंडस्ट्री मधले स्ट्रगल करून नाव कमावलेले दिग्गज आणि जे. जे., रहेजा, रचना, मॉडर्न ह्या सारखा आर्ट्स कॉलेज मधले विद्यार्थी आपली कला सदर करतात. त्यावर एक्सपर्ट्स कॉमेंट्स आणि टिप्स मुळे बर्‍याच विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा देखील होत आहे. डाइरेक्ट इंडस्ट्री एक्सपर्ट्स कडून मिळालेल्या टिप्स मुळे डिग्री आणि actual फील्ड वर्क मधला gap भरून काढण्याचा काम अस्मिताची टीम करत आहे.

अस्मिताची संकल्पना आशिष गंध्रे यांनी मांडली आहे. गंध्रे सर, हे स्वतः एक फोटोग्राफर आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळं करण्याच्या जिद्दीतून त्यांनी अस्मिताची सुरूवात केली आहे. कॉलेज मधली डिग्री आणि इंडस्ट्री मधला अनुभव, ह्यातली पोकळी भरून काढण्याचा गंध्रे सरांचा एक प्रयत्न.

अधिक माहितीसाठी www.asmita.co.in ह्या संकेतस्थळा भेट द्या अथवा फसेबूक वर “अस्मिता अकॅडेमिक कॉन्सेप्ट्स” हा ग्रूप जॉइन करा.

happy monsoon… :)

हाकेला तो ऐकून आला…
झम-झम झम-झम बरसून गेला..
पहिल्या पावसातली ओली माती…
ओला सुवास, झाडांवरची नवीन नाती
नवीन पालवी, नवी उमेद…
नव्या आकांक्षा नवी झेप..
happy monsoon… 🙂

एक-दा तरी भिजवून जाना….

चाहूल लागली आणि मन हूरहुरले…
आकाशाशी डोळे खिळले…
असा कसा तू चकवून गेलास…
वार्‍या संगे भूर्रकन उडालास…
पुन्हा येना, वळून येना…
वाट पाहतो लवकर येना..
एक-दा तरी भिजवून जाना….
–Paps

कारण आम्ही वृद्ध झालो…

गेटचा आवाज ऐकताच सगळ्यांच्या माना एकाच वेळेला गेट जवळ वळल्या. आत शिरल्यावरच एक विचित्र अशी फीलिंग आली. बाहेरच्या गॅलरी मधे एक मोठा टी.व्ही. ठेवला होता आहे बरीचशी मंडळी कोणता तरी चित्रपट् पाहत होती. आम्हाला पाहून प्रत्येकाच्या मनात हूरहूर सुरू झाली. हे नक्की कुणाला भेटायला आले आहेत हे कुणालाच समजेना. नायगाव पासून ७ – ८ की. मी. आत. मुंबई अहमदाबाद हाइवे वर चिंचोटी नाक्याहून १० मिनिटांच्या अंतरावर कामण नावाचे एक छोटेशे गाव आहे. तिथले “स्वयं-सिद्धा वृद्धाश्रम” हे सध्या श्री. पानसरे नावाचे आजोबा चालवतात. आम्ही आत गेल्यावर १०-१५ मिनिटे त्यांच्या कार्यालयात बसून त्याच्या कडून बरीच अशी माहिती जाणुन घेतली. वसईमधील श्रीमती. कल्पना संजय चुरी ह्या या आश्रमाच्या ट्रस्टी आहेत. हे आश्रम गेली ८ वर्षा पासून चालू आहे. जागा तशी लहान आहे. बैठ्या बांधणीचे एक लांब, शाळेसारखे दिसणारे घर. बाहेर एक छोटीशी बाग. बागेला लागून एक गणपती आणि शंकर मंदिर. पानसरे काकांशी बोलून आम्ही बाहेर बसलेल्या एक दोन आजी आजोबांबरोबर गप्पा मारल्या. कुणाच्या मुलाने कुणाला इथे आणून सोडला तर कुणाच्या दिराने आपल्या वहिनीला. प्रत्येकाची आपली अशी एक स्वतंत्र दुखी कहाणी होती. ते सगळं बघून आणि ऐकून मन भरून आलं. एका मावशिंची तर स्मृति देखील गेली होती असं आम्हाला कळलं. आपल्या पैकी कुणालाही ह्या आश्रमाला काही मदत करायची असेल तर नक्की कॉंटॅक्ट करा. सद्ध्या त्यांना इनवरटर च्या बॅटरीची गरज आहे. “स्वयं-सिद्धा वृद्धाश्रम” कॉंटॅक्ट नंबर : ९८९०५२४१८३. तुम्हाला जर आश्रमाला भेट द्यायची असेल तर आधी फोन वर चौकशी आणि नंतर जा. रेलवे ने जाणार असाल तर नायगाव स्टेशन ला उतरून पूर्वेला या. आणि तिथून चिंचोटी साठी शेअर रिक्षा मिळेल. माणसी १० रुपये. जर स्वतंत्र गाडीने जाणार असाल तर मुंबई-अहमदाबाद हाइवेवर मीरा भायंदर सोडल्यावर काही वेळाने चिंचोटी नाक्याला पोलीस चौकी जवळून राइट टर्न घ्या आणि कुणाला तरी पुढचा गावातला रस्ता विचारा.